दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पासाठी ठेवी ठेवण्याच्या चेअरमन श्रीराम शेटे यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून दिंडोरी येथील शेतकरी सहकारी संघाने पाच लाखांची ठेव कादवा कारखान्याकडे ठेवली आहे.
शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष दिलीपराव जाधव,उपाध्यक्ष खंडेराव संधान,संचालक बाळासाहेब दिवटे,बाळासाहेब गायकवाड,रामदास पाटील,गंगाधर निखाडे यांनी कादवा कारखान्यावर चेअरमन श्रीराम शेटे यांची भेट घेत त्यांचेकडे पाच लाख रुपये ठेविचा धनादेश सुपूर्द केला.यावेळी संचालक विश्वनाथ देशमुख,सभासद शिवाजीराव दळवी,लेखापाल सत्यजित गटकळ आदी उपस्थित होते.