दिंडोरी : तालुक्यातील खेडगाव येथील बाळासाहेब ठुबे या शेतकऱ्याने वीज तोडली म्हणुन आत्महत्या केली असूूून सदर प्रकरणी ऊर्जा मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीचे निवेदन वणी पोलीस स्टेशनला स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आले. वणी पोलीस स्टेशनमध्ये एपीआय रजपूत यांची स्वाभिमानीचे राज्य कार्यकारणी सदस्य सोमनाथ बोराडे, दिंडोरी तालुका अध्यक्ष सचिन कड, चांदवड तालुका अध्यक्ष अभय सूर्यवंशी, मुकुंद आहेर या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन ऊर्जा मंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा असे निवेदन दिले.