दिंडोरी – तालुक्यातील शिंदवड येथे दुपारी दोन वाजता रिमझिम असा पाऊस सुरु झाला, त्यानंतर अचानक तीन वाजता पावसाने रौद्ररुप धारण केले. काही क्षणातच गावातील नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यानंतर पूरस्थिती निर्माण झाली. शिंदवड येथील फरशीवरुन पाणी वाहू लागल्याने वडनेर भैरव, खेडगाव,तिसगाव,बहादुरी आदि गावांचा संपर्क तुटला. या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले. काढणीस आलेली सोयाबीन पाण्यात असून कापून ठेवलेली सोयाबीन आदी पिके पाण्यात तरंगू लागली आहे. द्राक्ष छाटणीचा हंगाम सुरु असून पोंगा अवस्थेत बागा आहे. त्यामुळे घड जिरु नये म्हणून अधिकचा खर्च शेतक-यांना करावा लागणार आहे. टोमँटो पिके देखील पावसाने खराब होत आहे. या पावसाने शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे.