दिंडोरी – डोनेट डिव्हाईस या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिंडोरी क्रमांक १ येथे सर्व शिक्षकांनी सोशल डिस्टन्सचे नियम पाळून शाळेतील विद्यार्थ्यांना ४० एफ एम रेडिओ संच , १० अँड्रॉइड मोबाईल , ३ साधे मोबाईल तसेच शाळेसाठी ४ दूरदर्शन संच , १ कॉम्प्युटर मॉनिटर भेट दिले. या कार्यक्रमात गटशिक्षण अधिकारी भास्कर कनोज, दिंडोरी नगर पंचायतचे मुख्याधिकारी नागेश येवले यावेळी उपस्थितीत होते.
या भेटीत एक दूरदर्शन संच पालक मच्छिंद्र चौघुले यांनी शाळेला भेट दिला. अर्थ फाऊंडेशन नाशिकच्या विद्यमाने दगडे मॅडम यांचे मार्फत शाळेसाठी दोन दूरदर्शन संच , एक प्रिंटर, एक वायफाय डीव्हॉइस, एक टेबल शाळेला भेट दिले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज , विस्तार अधिकारी सुभाष पगार , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले. नगर पंचायतचे मुख्यकार्यकारी अधिकारी नागेश येवले यांनी बोलताना सांगितले शाळा बंद पण तरीही शिक्षण सुरू आहे. या उपक्रमाचे कौतुक करून सर्वोतोपरी शाळेसाठी नगर पंचायत मार्फत मदत करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी केंद्रप्रमुख पी. डी. चौरे, मुख्याध्यापक रमाकांत मोरे, सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती प्रभावती राऊत व दगडू खैरनार यांनी केले तर आभार गणेश बोरसे व अप्पासाहेब घुले यांनी मानले.