दिंडोरी : शहर व तालुक्यात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून दिंडोरी शहर अवघे भगवेमय करण्यात आले होते. ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. अनेक शिवप्रेमींनी आपल्या घर गाड्यांना भगवे,शिवरायांचे फोटो असलेले ध्वज लावले होते.जय भवानी,जय जिजाऊ जय शिवराय आदी घोषणा देण्यात आल्या.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव
येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे भव्य आरास उभी करण्यात आली होती.माजी आमदार रामदास चारोस्कर,तहसीलदार पंकज पवार,पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे,नगराध्यक्ष रचना जाधव,उपनगराध्यक्ष कैलास मवाळ सर्व नगरसेवक,शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश देशमुख,काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड,जेष्ठ नेते बाळासाहेब जाधव,शिवाजीराव जाधव,शिवाजीराव पिंगळ,सागर पगारे,सुजित मूरकुटे,संतोष मुरकुटे आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जयंती यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
युवक उत्सव समितीची भव्य आरास
दिंडोरी तालुका युवक उत्सव समितीतर्फे भव्य आरास उभारण्यात येऊन रोषणाई करण्यात आली माजी आमदार रामदास चारोस्कर,तहसीलदार पंकज पवार,पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे आदी विविध मान्यवरांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे पूजन करण्यात आले उत्सव समितीचे सोमनाथ जाधव,रवी जाधव आदी कार्यकर्त्यांनी स्वागत केले.