दिंडोरी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी, सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून एक आदर्श निर्माण करावा असे आवाहन नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी केले
दिंडोरी येथे पंचायत समिती सभागृहात दिंडोरी पोलीस ठाणे अंतर्गत गणेश उत्सव मंडळ व शांतता समितीची बैठक संपन्न झाली. याबैठकीत मार्गदर्शन करतांना त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती व शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांनी काटेकोरपणे पालन करावे व यावर्षीचा गणेशोत्सव सण अतिशय साध्या पद्धतीने साजरा करून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. तसेच सर्व गणेशोत्सवाच्या मंडळांनी एकाच वेळेस नियमित आरती करून एक चांगला आदर्श निर्माण करावा व विसर्जन करताना कुठल्याही प्रकारचे मिरवणूक न काढता आपल्या घरीच विसर्जन करावे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे, तहसीलदार कैलास पवार, नगराध्यक्ष कैलास मावळ, नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागेश येवले, दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रास्तविक पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांनी केले. त्यांनी सर्व गणेश मंडळांना आवाहन केले की शासनाच्या नियमांचे पालन करून आपण गणेशाची स्थापना करावी. जानोरीसह इतर २३, घरातच गणेशाची स्थापना करून विसर्जन करणे हा निर्णय घेतला आहे. हाच आदर्श तालुक्यातील सर्वच गावांनी घ्यावा. तहसीलदार कैलास पवार यांनी शासनाची नियमावली सांगत एक गाव एक गणपती बसविण्याचे आवाहन केले. नगराध्यक्ष कैलास मावळ, पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कथार, नगरसेवक माधवराव साळुंखे, फारुख बाबा यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, शांतता कमिटीचे मनोज ढिकले, काका देशमुख पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ पाटील मुळाणे, भगवान गायकवाड, अशोक निकम, बाळासाहेब अस्वले, अशोक सांगळे, वामन पाटील, रोशन परदेशी, निलेश बोडके, तौशिफ मणियार, गलीफ मिरजा, पो कॉन्स्टेबल लहारे यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व तालुक्यातील पोलीस पाटील व शांतता कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण यांनी केले. तर आभार पोलीस उपनिरीक्षक डफळ मॅडम यांनी मानले.
दिंडोरीत एकच गणपती – नगराध्यक्ष मवाळ
दिंडोरी नगरपंचायतीने सर्व गणेश मंडळांची बैठक घेतली. त्यात संपूर्ण शहराचा एकच गणपती बसविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्ष कैलास मवाळ व नगरसेवक माधवराव साळुंखे यांनी याबाबत माहिती दिली.