दिंडोरी : शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी प्रशासन सातत्याने जनजागृती करत आहे. मात्र तरीही काही नागरिक बेफिकीर पणे वागत असल्याने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर तसेच नियम न पाळणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तहसीलदार पंकज पवार,मुख्याधिकारी नागेश येवले सहायक पोलिस निरीक्षक नवले यांनी दिंडोरी शहरात फिरत पाहणी करून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत 40 नागरिकांकडून सुमारे नऊ हजार दंड वसूल करण्यात आला. पूर्ण लॉकडाउन होऊ नये यासाठी नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचना नियमांचे पालन करावे, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, बाजारपेठेत गर्दी करू नये, सोशल डिस्टन्स पाळावे, प्रत्येकाने मास्क वापरावा, सॅनिटायझर चा वापर करावा, नियमित साबणाने हात धुवावे, असे आवाहन तहसीलदार पंकज पवार यांनी केले आहे.