दिंडोरी : शहरातील विविध प्रलंबित विकासकामांना भरघोस निधी देण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश देशमुख यांचे नेतृत्वाखाली दिंडोरी येथील शिष्टमंडळाने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत दिंडोरी शहरातील प्रलंबित विकासकामांबाबत चर्चा केली यावेळी शिंदे बोलत होते.
धामण नदी संवर्धन प्रकल्प , दिंडोरी शहरातील क्रीडा संकुल, नगरपंचायतची प्रशासकीय इमारत बांधकाम ,शहर परिसरातील शिवार रस्ते, धामण नदी वरील मारुती मंदिराजवळील पूल, नगरपंचायतचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी समावेशन व त्यांना किमान वेतन श्रेणी लागू करणे,गांधीनगर,जाधव वस्ती विकास प्रकल्प ही कामे नगरविकास खात्यातर्फे करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले, यासह दिंडोरी शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सतीश देशमुख युवासेना विस्तारक निलेश गवळी, नगरसेवक सचिन देशमुख, युवानेते रणजित देशमुख, नितीन गांगुर्डे आदी उपस्थित होते.