दिंडोरी : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्यातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट चीफ इंजिनिअर पुरस्कार कादवा सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनिअर विजय माधवराव खालकर यांना जाहीर झाला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तर्फे राज्यातील साखर कारखान्याचे विविध विभागातील अधिकाऱ्यांना वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात येते.सन २०१९-२० गळीत हंगामाचे पुरस्कार जाहीर झाले असून त्यात उत्कृष्ट चीफ इंजिनिअरिंग म्हणून विजय खालकर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.कादवा सहकारी साखर कारखान्याचे आधुनिकीकरण करण्यात येऊन १२५० मेंटन क्षमतेवरून २५०० मेंटन प्रतिदिन गाळप क्षमता करण्यात आली आधुनिकीकरणाचे काम यशस्वी होत कादवाची गाळप कार्यक्षमता वाढली.या यशामुळे विजय खालकर यांना उत्कृष्ट चीफ इंजिनिअर पुरस्कार जाहीर झाला आहे.त्यांच्या यशाबद्दल कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे,व्हा.चेअरमन उत्तमबाबा भालेराव,सर्व संचालक मंडळ,अधिकारी कामगार यांनी अभिनंदन केले आहे.