दिंडोरी : तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने वाढत्या विजबिलाच्या विरोधात महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकून निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत ग्राहकांचे विज कनेक्शन तोडू नये अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव,माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख ,माजी पंचायत समिती सदस्य श्याम बोडके,माजी जिप सदस्य मनीषा बोडके, शहराध्यक्ष श्याम मुरकुटे, नगरसेवक तुषार वाघमारे ,योगेश बर्डे,अमर राजे,संपत पिंगळ,प्रभाकर वडजे,आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.