दिंडोरी : येथील वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी मडकीजाम येथील शेतकऱ्यास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग व्हायरल झाले असून शेतकऱ्यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. सदर अधिकाऱ्यास त्वरित निलंबित करून खातेनिहाय चौकशी करत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे
मडकीजाम येथील बोराडे या शेतकऱ्यांनी वीज बिल भरले आहे. तरी वीज जोडून द्या यासाठी वीज मंडळाचे कनिष्ठ अभियंता बोरकर यांना फोन केला असता सदर अधिकाऱ्यांनी अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. तसे फोन ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. सदर अधिका-याबाबत यापूर्वी काही सहकारी कर्मचारी यांनीही तक्रार केली होती. तसेच काही राजकीय पदाधिकारी यांनीही तक्रार केली होती. मात्र कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. याबाबत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचेकडे तक्रार केली असून त्यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.