द्राक्ष उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही – झिरवाळ
दिंडोरी : तालुक्यात तीन दिवस सतत पडणा-यां अवकाळी पावसामुळे द्राक्षबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या संदर्भात एकही नुकसान ग्रस्त शेतक-याला मी वाऱ्यावर सोडणार नाही माझ्या समोरच अवकाळी पाऊस पडत होता मी हि शेतकरी आहे सध्या महाराष्ट्रात करोनामुळे सरकारची आर्थिक परिस्थिती जरी गंभीर असली तरी शेतकरीही महत्वाचा आहे त्यासाठी मी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचेशी बोलून शेतक-यांना नक्कीच न्याय मिळून देणार आहे सर्व नुकसान ग्रस्त शेतक-यांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावे असे आव्हान महाराष्ट्र विधानसभाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नळवाडी, निगडोंळ, पाडे, निळवंडी, मोहाडी, खडकखुकाणे,चिंचखेड, मावडी, अहिंवतवाडी,हस्तेदुमाला आदी ठिकाणी नुकसान ग्रस्त द्राक्षबागाची पाहणी केली तेव्हा त्यांनी शेतक-यांशी संवाद साधला.
तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकरी वर्गाने झिरवाळ यांचे पुढे अनेक समस्या मांडल्या त्या गेल्या दोन वर्षापासून आम्ही या आशा संकटाना तोंड देत आहे मागील वर्षीही करोनामुळे द्राक्षबागेचा हंगाम वाया गेला त्यांतुन आम्ही कसा तरी मार्ग काढून गेल्या चार महिन्यापासून वातावरणात होणा-या बदलाचा सामना करून द्राक्षबागा वाचविल्या होत्या मात्र आता अवकाळी पावसाने आमचे मोठे नुकसान झाले आहे दोन वर्षापासून आम्ही सतत संघर्ष करित असताना आता आम्ही कर्जबाजारी झालो आहे आशा भावना नुकसान ग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यानी व्यक्त केल्या.
यावेळी झिरवाळ यांनी सर्व अधिकारी वर्गाला तालुक्यातील एकहि नुकसान ग्रस्त शेतक-यांचा पंचनामा राहता कामा नये सर्व कृषी विभागातील अधिकारी,तलाठी,ग्रामसेवक यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करा एकही तक्रार येता कामा नये अस्या सूचना प्रशासनाला दिल्या.