दिंडोरी : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या विकेंड लॉकडाऊनला जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात मेडिकल व दवाखाने वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवत नागरिकांनीही घरीच राहणे पसंत करून विकेंड लॉक डाऊन ला साथ दिली.
शहरात दवाखाने व मेडिकल सुरू होते इतर सर्व व्यवसाय बंद असल्याने नागरिकांची वर्दळही थांबली होती. पोलिसांनी पालखेड चौफुलीवर चेकपोस्ट करत येणाऱ्या जाणाऱ्यांची विचारपूस केली शेतमालाची किरकोळ वाहतूक सुरू होती. नागरिकांनीही या लॉकडाऊनला प्रतिसाद देत घरीच राहणे पसंत केले.
मोहाडी त सात दिवस जनता कर्फ्यू
मोहाडी ग्रामस्थांनी बैठक घेत कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सात दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला असून गाव कोविड मुक्त करण्याचा संकल्प केला आहे.
दिंडोरी तालुक्यात ६३८ रुग्ण
हॉटस्पॉट बनलेल्या मातेरेवाडी त परिस्थिती नियंत्रणात वणी व खेडगाव मध्ये रुग्ण वाढले. तालुक्यात ६३८ रुग्ण ऍक्टिव्ह असून हॉटस्पॉट बनलेल्या मातेरेवाडी येथील रुग्ण संख्या घटली आहे आता २६ रुग्ण एकटिव्ह आहे तर सर्वाधिक रुग्ण वणीत ७८ दिंडोरीत ६९ खेडगाव ५५,उमराळे बु ३० मोहाडी २६ चिंचखेड २५ सोंनजांब २३ लाखमापूर २३ असे विविध गावात रुग्ण असून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुजित कोशिरे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभावित गावात व परिसरात सर्वेक्षण तपासण्या सुरू आहे. नागरिकांनी काळजी घेत नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर,तहसीलदार पंकज पवार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुजित कोशिरे यांनी केले आहे.