दिंडोरी – नरोत्तम शेख सारिया फाउंडेशन मुंबई यांच्यामार्फत तंबाखूमुक्त अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दारू बंदी व व्यसनमुक्ती चळवळीत काम करणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूरच्या माजी सरपंच ज्योतिताई देशमुख यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
ज्योतीताई देशमुख या दारू बंदी व व्यसनमुक्तीचे काम गेली अनेक वर्षे सातत्याने करत आहे. त्यांनी गेल्यावर्षी विविध शाळा महाविद्यालयात तंबाखू व त्याचे दुष्परिणाम यावरील व्याख्यानांचे माध्यमातून त्यांनी तंबाखू मुक्तीबाबत प्रबोधन केले होते. त्यांच्या या कार्याची दखल नरोत्तम शेख सारिया फाउंडेशनने घेत त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला आहे .