दिंडोरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिंडोरी तालुकाउपाध्यक्षपदी कादवा कामगार युनियनचे अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे यांची निवड झाली आहे.विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते नुकतेच दत्तात्रेय वाकचौरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष भास्कर भगरे,डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी,रायुकॉ तालुकाध्यक्ष शाम हिरे ,कामगार युनियनचे सरचिटणीस संतोष मातेरे,सुरेश फुगट, अजय दवंगे ,सुहास गायकवाड,अजित दवंगे,चंद्रभान कदम, शिवाजी शिरसाठ,अमोल जमधडे, शिवाजी गांगोडे, प्रतीक वाकचौरे, रमेश कावळे, नामदेव कावळे, अशोक क्षिरसागर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. वाकचौरे यांचे निवडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्रीराम शेटे,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील,बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील आदींनी अभिनंदन केले.