दिंडोरी : दोन दिवसांपूर्वी नितेश राणे या व्यक्तीने पत्रकार परिषद घेऊन युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले. या आरोपात कोणतेही तथ्य नाही असे सांगत युवा सेनेने नितेश राणेंचा जाहीर निषेध दिंडोरी येथे करण्यात आला. युवासेना विस्तारक निलेश गवळी व जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना उपजिल्हाधिकारी किरण कावळे आणि माजी विद्यार्थीसेना तालुका प्रमुख सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले,
निषेध नोंदवताना राणेंच्या प्रतिमात्क बॅनरला काळे फासून निषेध नोंदविण्यात आला. तसेच या पुढे असे वक्तव्य केल्यास महाराष्ट्र भर फिरू न देण्याचा इशारा युवासैनिकांनी दिला. युवासेनेच्या वतीने दिंडोरी पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांना निवेदन देण्यात आले
या प्रसंगी युवासेना समनव्यक संगम देशमुख उपजिल्हाधिकारी किरण कावळे माजी विद्यार्थीसेना तालुका प्रमुख सुनील जाधव, शिवसेना शहर प्रमुख दिंडोरी संतोष मुरुकुटे, उपतालुका प्रमुख राहुल गणोरे, चेतन उफाडे शिवसागर पवार, उत्तम कावळे, बच्चन कावळे, योगेश कावळे, आकाश कावळे, गुलाब पवार, सागर पवार युवराज शिंदे, आदी युवासैनिक उपस्थित होते.