दिंडोरी – युवा सेना युवकांनबरोबरच महिलांच्याही पाठीशी खंबीरपणे उभी असून महिलांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे भविष्यात महिलांच्या रोजगारासाठी युवा सेना पुढाकार घेईल असे प्रतिपादन युवा सेना जिल्हाधिकारी आदित्य केळकर यांनी केले
दिंडोरी तालुका युवा सेनेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाचे औचित्य साधून १०० महिला कामगारांना सेफ्टी शूज, फेस शिल्ड आणि फेस मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवासेना विस्तारक व सहसचिव निलेश गवळी, शिवसेनेचे वरिष्ठ नेते जयंत दिंडे उपस्थित होते. याप्रसंगी युवा सेना
जिल्हाधिकारी (ग्रामीण) आदित्य केळकर बोलत होते.
दिंडोरी पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात युवा सेनेच्यावतीने महिलांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वताची व कुटुंबाची काळजी घेण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. यावेळी महिलांना सेप्टी शुज फेस शिल्ड आणि फेस मास्कचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन शिवसेनेचे दिंडोरी तालुकाप्रमुख सतीश देशमुख व युवा सेनेचे उप-जिल्हाध्यक्ष निलेश शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला शिवसेनेच्या नाशिक महिला जिल्हा प्रमुख सौ. मंगलाताई भास्कर, दिंडोरी महिला तालुका प्रमुख सौ. अस्मिता जोंधळे, दिंडोरी पंचायत समिती माजी उपसभापती कैलास पाटील, युवासेना जिल्हा चिटणीस संगम देशमुख, युवासेना तालुका अधिकारी किरण कावळे, अरुण गायकवाड. सुनील जाधव,सागर जाधव, आबा जाधव, नदीम सैयद आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शेकडो महिला कामगारांनी शिवबंधन बांधून व भगवा झेंडा हाती घेऊन शिवसेनेत प्रवेश केला.