दिंडोरी : लोकसभा मतदार संघात युवासेनेची बळकट बांधणी व नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये युवकांचा सहभाग व कामकाजाचा आढावा यासाठी दौ-यावर आलेले युवासेनेचे राज्यविस्तारक तथा युवासेना दिंडोरी लोकसभा विस्तारक निलेश गवळी यांनी नुकतेच दिंडोरी येथे शासकीय विश्रामगृहावर युवासेना पदाधिकारी व युवासैनिकांशी संवाद साधला. वणी येथील काही युवासैनिकांनी गवळी यांच्या उपस्थितीत युवासेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे समवेत युवासेना जिल्हा अधिकारी आदित्य केळकर शिवसेना तालुका प्रमुख सतिष देशमुख उपस्थितीत होते.
राज्यविस्तारक गवळी यांनी युवासेनेच्या पदाधिकारी यांचेशी संवाद साधत तालुक्यातील कामकाजाचा आढवा घेत,युवासैनिकांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या दृष्टीने कामकाज करावे, घराघरात जावून युवकांच्या समस्या जाणुन घ्या, वार्डात,प्रभागात पदाधिकारी नेमुन त्यांचेकडून प्रभागात जनहिताची कामे करुन घ्या,आपल्या सरकारची कामे पोहचवा. प्रत्येक प्रभागात निवडणुकांसाठी उमदेवार तयार ठेवून,त्यादृष्टीने काम करणे आवश्यक आहे. असे गवळी यांनी संवाद सांधताना मार्गदर्शन केले. युवासेना जिल्हा अधिकारी आदित्य केळकर यांनी दिंडोरी युवासेनेच्या कामकाजाचे कौतुक केले.
तसेच युवासेनेच्या तालुका अधिकारी किरण कावळे यांनी तालुक्यातील शहरातील निवडणुकांच्या संर्दभात काही समस्या सांगीतल्या,यावेळी युवासेनेचे उपजिल्हाधिकारी निलेश शिंदे,तालुका अधिकारी किरण कावळे,तालुका समनव्यक किरण कड, उपतालुका आधिकरी राहुल गणोरे,सुनील पवार, गट आधिकरी चेतन उफाडे, वणी शहर प्रमुख जगन सताळे, मोहाडी शहर अधिकारी अक्षय मोगरे, सुनील जाधव,नदीम सय्यद,अरुण गायकवाड,सागर पवार,प्रतीक मेधने,विशाल शिंगाडे,मयूर चव्हाण,अनिकेत देशमुख आदी युवासैनिक आणि महिला आघाडी उपस्थित होते.