दिंडोरी – तालुक्यातील म्हेळूस्के येथील ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे युवा नेते योगेश बर्डे यांच्या ग्रामविकास पॅनलने सहा जागांवर विजय मिळवत सत्तेची चावी आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बाजीराव बर्डे यांच्यास परिवर्तन पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले.
तीन प्रभागांमध्ये एकूण नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एक उमेदवार बिनविरोध झाल्याने आठ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी सहा जागांवर ग्रामविकास पॅनलने विजय मिळवला असून तीन जागांवर परिवर्तन पॅनलला समाधान मानावे लागले. ग्रामविकास पॅनलच्या सहा जागा निवडून आल्याने सत्तेची सूत्रे ग्रामविकास पॅनलचे योगेश बर्डे यांच्याकडे आली आहे.विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे प्रभाग क्रमांक १ – संतोष पाचोरकर,शोभा खिरकाडे,सुनिता आहेर
प्रभाग क्रमांक २ – योगेश बर्डे, योगिता बर्डे,मुक्ताबाई वायकांडे
प्रभाग क्रमांक ३ – सुनील गांगुर्डे,हिरामण गांगोडे, पुनाबाई गांगोडे