शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दिंडोरी – म्हेळूस्केत बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार, रोजंदारी कुटुंबावर उपासमारीची वेळ

by Gautam Sancheti
डिसेंबर 28, 2020 | 2:03 pm
in स्थानिक बातम्या
0

दिंडोरी :  तालुक्यातील म्हेळूस्के येथील बनकर वस्तीवर काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तब्बल सात शेळ्या ठार झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून रोजंदारी करणाऱ्या कुटुंबावर उदरनिर्वाहाचे साधन हिरावल्याने उपासमारीची वेळ आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
      याबाबत अधिक माहिती अशी की, येथील शेतकरी प्रकाश बनकर यांच्या शेतावर मोलमजुरी करण्यासाठी दत्तू गायकवाड हे आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. मोलमजुरी बरोबरच संसाराला आधार म्हणून ते शेळीपालनही करत होते. परंतु,काल मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर अचानक बिबट्याने हल्ला केल्याने सहा शेळ्या जागेवर ठार झाल्या तर एक शेळी बिबट्याने अंधाराचा फायदा घेत अडचणीत नेऊन फस्त केली. एकाच्या दोन,दोनाच्या चार करत गायकवाड यांनी सात शेळ्या सांभाळल्या होत्या. पण बिबट्याने हल्ला केल्याने जवळपास पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याने गायकवाड हे हतबल झाले असून मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबावर असे  संकट ओढावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.बिबट्याच्या हल्ल्याने वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तळेगांव दिंडोरी सरपंचपदी अजय चारोस्कर

Next Post

श्री दत्त जयंती महात्म्य आणि पूजा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

श्री दत्त जयंती महात्म्य आणि पूजा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011