दिंडोरी – तालुक्यातील मोहाडी येथे कोराटे रस्त्यावरील संतोष तिडके यांच्या शेताच्या बांधावर लावलेल्या पिंजर्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. मोहाडी व परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर असतो. मागील पाच सहा महिन्यांपासून परिसरातील कुत्र्यांना बिबट्याने भक्ष केले होते त्यामुळे येथील नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती, परंतु वनविभागाने लॉकडाउन चे कारण सांगून पिंजरा लावण्यात टाळाटाळ करत होते. येथील नागरिकांनी विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांच्याकडे पिंजरा लावण्याची मागणी करताच वनविभागाच्यावतीने ६ दिवसांपूर्वी पिंजरा लावला असता बुधवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. वनविभागाने ताब्यात घेत नाशिक येथे रवानगी केली, त्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा स्वास टाकला आहे.