दिंडोरी – विवाह सोहळ्यानंतर वराच्या घरी वरातीचा कार्यक्रम होतो.यासाठी हजारो रुपयांचा खर्च होतो.केवळ वाद्यासाठी नाही तर तरुण पिढी कळत-नकळत मद्यपान कडे वळते.परंतु प्रहार या संघटनेचे कार्यकर्ते सुरेश उशीर यांचे चिरंजीव कमलेश यांच्या विवाह प्रसंगी कोणत्याही परिस्थितीत वरात न करण्याचा निर्णय निर्णय घेतला.या वेळी उशीर परिवाराने अभंग रचना भजनी मंडळाच्या माध्यमातून गाऊन कावेरी व कमलेश यांचे स्वागत उशीर परिवारात केले. त्यामुळे लग्नमंडपात भजनाचा गजर घुमला….
धोडंबे येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रहार या संघटनेचे सक्रीय कार्यकर्ते सुरेश उशीर यांचा मुलगा कमलेश यांचा विवाह मातेरेवाडी येथील सुरेश गटकळ यांची कन्या कावेरी यांचा विवाह करण्यात आला.यावेळी वरातीसाठी परिसरातील तीस चाळीस भजनी मंडळांनी महाराष्ट्रातील विविध संतांच्या अभंग रचना सादर करून परिसरातील युवकांना या कार्यक्रमात सहभागी करून घेतले.
विवाह हा विधी नसून तो एक इव्हेंट झाला आहे. ही भ्रामक कल्पना आत्ताची तरुण-तरुणी मध्ये आहे. भव्यता,प्रदर्शन आणि अनाठायी खर्च याकडे वधू वर मातापित्यांना कधी कधी इच्छा नसतांना सुद्धा प्रतिष्ठेपायी जावे लागते. परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत.विवाह सोहळा आनंदाचा नक्कीच असतो तसेच तो मांगल्याचा व पावित्र्याचा सुद्धा असतो.असे मत वर पिता सुरेश उशीर यांनी व्यक्त केले.