दिंडोरी : दमण येथे सहलीला गेलेल्या दिंडोरीतील प्रतिष्ठित डॉक्टर दांपत्याने परततांना तेथील स्वस्त दारू मित्रांसाठी आणली. पण, ती त्यांना चांगलीच महागात पडली. गुजरात पोलिसांनी त्यांचे वाहन व दारूही जप्त करत त्यांच्याविरुद्ध अवैधपणे मद्य वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल केला. याबाबत गुजरात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिंडोरी शहरात नावाजलेल्या डॉक्टर दांपत्याने स्वतःचे वाहनाने दारु आणली. पण, दमण कडून नाशिककडे येत असतांना दमण व गुजरात सीमेवरचे पोस्टवर तपासणी झाली. या तपासणीत कारच्या सीट खाली ३४ बॉक्स दमण निर्मित दारू मिळून आली. गुजरात पोलिसांनी चौकशी केली असता या डॉक्टर दाम्पत्याने मित्रांना वाटप करण्यासाठी दारू घेऊन जात असल्याची कबुली दिली आहे. या घटनेने दिंडोरी शहरात खळबळ माजली आहे