दिंडोरी – दिंडोरी शहरात कोरोना विष्णू संसर्ग आटोक्यात रहावा, त्याचा फैलाव होऊ नये म्हणून नगरपंचायत प्रशासन शहरात वारंवार मास्क वापरावा सोसियल डिस्टन्स पाळावे यासाठी सातत्याने प्रबोधन केले जात आहे. घंटागाडीच्या माध्यमातून लाऊडस्पीकर द्वारे नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजना व सूचना देत आहे. तरीही शहरात कोरोना बाबत काही नागरिक बेफिकिरी दाखवत आहे. म्हणून नगरपंचायत प्रशासनाने महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन याचे बरोबर संयुक्तिक कार्यवाही करून भरारी पथक नेमत दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे.
सोमवारी ६८ नागरिकांवर मास्क न वापरल्याबद्दल दंडात्मक कारवाई करत एकूण रुपये १४ हजार ३२० दंड वसुली केली आहे. तसेच नागरिकांना मोफत मास्कचेही वाटप केले. पोलीस प्रशासनामार्फत कोरोना विषयक नियम न पाळणाऱ्या वाहनधारक व विनामास्क नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दिंडोरी शहरात आत्तापर्यन्त रुग्णसंख्या आटोक्यात आहे.
नगरपंचायत प्रशासनाने दिंडोरीत सातत्याने गर्दी होऊ नये मास्क वापरावे याबाबत प्रबोधन केले. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पथनाट्याद्वारे स्वछता विषयक जनजागृती केली. दिंडोरी शहरात दिवसभर दवंडीची गाडी फिरवत नागरिकांचे प्रबोधन सुरू ठेवले आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले, तहसीलदार पंकज पवार, पोलीस उपनिरिक्षक कल्पेशकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी प्रशांत पोतदार, कर निरीक्षक प्रदीप मावलकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग धीरज भामरे, नगर अभियंता सुनील पाटील, ईश्वर दांडगव्हाळ, हर्षल बोरस्ते, अमोल मवाळ, राजेंद्र खिरकाडे, राजेंद्र गायकवाड, सचिन जाधव, दीपक सोळंकी इत्यादी नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी यांनी शहरात धडक मोहीम राबवत मास्क न वापरणाऱ्या दुकानांपुढे सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी व्यापाऱ्यांनी काळजी घेत मास्क वापरावे, सोसियल डिस्टन्स पाळावे, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दी करू नये शासनाचे नियम सूचनांचे काटेकोर पालन करावे व कोरोना विरुद्धच्या लढाईत सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी नागेश येवले इतर सर्व अधिकाऱ्यांनी केले.