दिंडोरी – शहरात कोरोना रुग्ण सातत्याने वाढत असून एकूण रुग्णसंख्या ११५ वर पोहचली आहे. नगरपंचायत प्रशासन शहरात वारंवार मास्क वापरावा सोसियल डिस्टन्स पाळावे यासाठी सातत्याने प्रबोधन करत आहे. मात्र तरीही काही नागरिक बेफिकिरी दाखवत असल्याने नगरपंचायत प्रशासनाने तीन भरारी पथक नेमत दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. गुरुवारी ४१ नागरिकांवर मास्क न वापरल्याबद्दल दंडात्मक कारवाई करत एकूण ४१०० रुपये दंड वसूली केली आहे.
त्याचप्रमाणे पंचायतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दिंडोरी शहरात गेल्या महिन्यापर्यंत रुग्णसंख्या कमी होती. मात्र या महिन्यात दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. नगरपंचायत प्रशासनाने दिंडोरीत सातत्याने गर्दी होऊ नये मास्क वापरावे याबाबत प्रबोधन केले. निर्धारित वेळेनंतर सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई करत दुकाने सील केली. दर रविवारी शहरात संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली जात आहे मात्र सद्या सर्व व्यवसाय अनलॉक झाल्याने बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. परिणामी रुग्णसंख्या ही वाढली असून त्यात खाजगी डॉक्टर व्यापारीही पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दिंडोरी नगरपंचायत प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेस प्रारंभ करण्यार आला आहे. ठिकठिकाणी प्रबोधनात्मक बॅनर लावण्यात आले असून दिवसभर दवंडी ची गाडी फिरवत नागरिकांचे प्रबोधन सुरू ठेवले आहे. तसेच मास्क वापरणे बंधनकारक करत त्याची प्रभावी अंमलबजावणी करत मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे .नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी प्रशांत पोतदार,कर निरीक्षक प्रदीप मावलकर,नगर अभियंता पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग धीरज भामरे,स्थापत्य अभियंता सुनील पाटील आदींच्या पथक नेमत शहरात धडक मोहीम राबवत मास्क न वापरणाऱ्या दुकानांपुढे सोसियल डिस्टन्स न पाळणाऱ्या विहित वेळेत दुकाने बंद न करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.नगरपंचायतचे सर्व अधिकारी कर्मचारी कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी व्यापाऱ्यांनी काळजी घेत मास्क वापरावे सोशल डिस्टन्स पाळावे सॅनिटायझरचा वापर करावा गर्दी करू नये शासनाचे नियम सूचनांचे काटेकोर पालन करावे व कोरोना विरुद्धच्या लढाईत सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष रचना जाधव,उपाध्यक्ष कैलास मवाळ, मुख्याधिकारी नागेश येवले व सर्व नगरसेवकांनी केले आहे.