शेतकऱ्यांनी केला आनंद व्यक
दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील मौजे धाऊर येथील शेतात जाणारा रस्ता गेल्या ५० ते ६० वर्षांपासून शोधला जात नव्हता व त्यावरून आजूबाजूला असणारे ४० शेतकरी यांना अडचणी येत होत्या .याबाबत महाराजस्व अभियानाअंतर्गत तहसीलदार पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उमराळे बु मंडळ अधिकारी भगवान काकड यांनी प्रत्येक्ष जागेवर जात तलाठी शिवाजी भोये, कोतवाल गायकवाड, ग्रा प सदस्य दिलीप बोंबले यांच्या समवेत ४० ते ५० शेतक-यांचे उपस्थितीत मिटींग घेतली व रस्त्याचे महत्व व गरज शेतकऱ्यांना समजून सांगितली व मौजे धाऊर ता. दिंडोरी येथील ४० शेतकरी कुटुंबाची अङचण असलेला रस्ता शासनाचे महाराजस्व अभियानांतर्गत २.५ कि.मी.चा मोकळा केला.
कालच मौजे धाऊर येथील शेतकरी नामदेव महादू उदार यांनी शेतीला रस्ता नसल्याने स्ताचा ऊस पेटवून दिल्याची क्लीप प्रसार माध्यमावर प्रसिद्ध झाली होती. याची तात्काळ दखल घेत मंडळ अधिकारी भगवान काकड तलाठी शिवाजी भोये यांनी सदर कुटुंबास भेट दिली. सदरहू शेतकरी यांनी रस्त्याचे अडचणीबाबत प्रशासनास कोणत्याही प्रकारे कळविलेले नव्हते. परंतु येथील आजूबाजूचे ४० शेतक-यांना रस्ताच नसल्याचे लक्षात आले. यावेळी सर्व शेतक-यांना बोलावून सहभागातून रस्ता देण्यासाठी तयार केले. व ५०-६० वर्षापासूनची समस्या निराकरण झाल्याने सर्व शेतक-यांनी आनंद व्यक्त केला.