दिंडोरी – पावसाळ्यात विविध शोभेची तसेच फुलांच्या झाडांची छाटणी केली जाते व ते फेकून दिले जाते, मात्र त्याचे कलम करत देवाणघेवाण करण्याचा बियाणे-कटींग्ज एक्सचेंज उपक्रम ईश्वर बांगर व शिल्पा मेंदडकर यांनी सोसियल मीडियाच्या माध्यमातून राबवत झाडांची जोपासना केली आहे. नुकत्याच या उपक्रमात सर्वाधिक कलम देणाऱ्या सदस्यांना ट्रॉफी व बागेचे साहित्य देत गौरविण्यात आले.
परसबागेत व गच्चीवर फुलझाडे , भाजीपाला व इतर झाडे लावण्याचा छंद असणाऱ्या शहरी सदस्यांसाठी ईश्वर बांगर आणि शिल्पा मेंदडकर आदींनी ”बियाणे-कटींग्ज एक्सचेंज नासिक ” या नावाने व्हाट्सआप ग्रुप बनविला , या ग्रुपमार्फत आतापर्यंत २०० सभासदांनी लाभ घेतला आहे. पावसाळ्यात मुख्यतः झाडांची कटींग्ज करतात व याच ऋतूत त्या चांगल्या रुजत असल्याने सभासदांनी त्या फेकून न देता कोरोनामुळे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून निःशुल्क देवाण घेवाण केली .
ग्रुपला प्रोत्साहन मिळावे म्हणून सर्वाधिक रोपांची देवाणघेवाण करणारे जुलै महिन्यातील योगेश वारे व ऑगस्ट मधील सौ.सोनाली शिंदे यांना ट्रॉफी व बागचे साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले .ग्रुपसाठी श्री .सोमण, श्री.प्रभुणे, श्री.कापसे सौ. कनोरे यांनीही परिश्रम घेतले