दिंडोरी – दिंडोरी येथील चौरंग फार्मचे संचालक प्रा.डॉ. घनशाम जाधव यांच्या फार्माकॉलॉजी या विषयाच्या पुस्तकाचे प्रकाशन सावित्राईबाई फुले विद्यापीठातील फार्माकॉलॉजी अभ्यासक्रमाचे चेअरमन डॉ.चंद्रशेखर उपासनी यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रा.डॉ. घनशाम जाधव हे कादवा कारखान्याचे संचालक बाळासाहेब जाधव यांचे सुपुत्र आहे. दिंडोरी नगरपंचायतच्या वतीने त्याना या वर्षी दिंडोरी भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. या पुस्तकात त्यांनी वेगवेगळ्या आजारावर कोणते औषध उपयुक्त आहे. त्याचा मानवी शरीरावर कसा उपयोग आहे. त्याचे साईड इफेक्ट काय आहे याची माहिती त्यांनी दिली या कार्यक्रमात दिली. या पुस्तकाचे वाचन केल्याने, बीफार्म,एमफार्म, पीएचडीच्या विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल असे प्रतिपादन डॉ. उपासनी यांनी केले. या प्रकाशन सोहळ्यात डॉ . शेखर आथरे, डॉ. विशाल गुलेच्या, डॉ. पवन उदावंत, डॉ. छाजेड, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.