दिंडोरी : पेट्रोल,डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेने बैलगाडी मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला. शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील माजी आमदार धनराज महाले तालुकाप्रमुख सतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती येथून बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. दुचाकी बैलगाडीत ठेवण्यात आली .मोदी सरकार हाय हाय डिझेल पेट्रोल गॅस दरवाढ मागे घ्या, आदी घोषणा देण्यात आल्या. पालखेड चौफुलीवर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी आमदार धनराज महाले,डॉ विलास देशमुख, तालुका उपप्रमुख नाना मोरे, आदित्य केळकर, बुरोद्दीन शेख आदींची भाषणे झाली. केंद्र सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडत निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी शिवसेना नेते सदाशिव गावित,किरण कावळे,संतोष मुरकुटे,पांडुरंग गणोरे,योगेश दवंगे,अरुण गायकवाड,सुनील जाधव,अविनाश वाघ,अमोल कदम आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांचे नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.