दिंडोरी : तालुक्यातील पिंपळगाव केतकी ग्रामपंचायत च्या सरपंच पदी बाळू भीका पवार व उपसरपंच पदी बाजार समितीचे उपसभापती अनिल दादा देशमुख यांची बिनविरोध निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी काटकर यांच्या उपस्थितीत निवडणूक होत सरपंचपदासाठी बाळू भीका पवार व उपसरपंच पदासाठी बाजार समितीचे उपसभापती अनिल दादा देशमुख यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.निवड घोषित होताच समर्थक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.