दिंडोरी : अवकाळी पावसाने दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भगात शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. काढणीस सुरूवात होत असताना कोसळलेल्या नैसर्गिक संकटाने घाला घातला आहे.या नुकसानग्रस्त भागाची पाहणी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी पाहणी दौरा करुन त्वरीत पंचनामे करण्याची मागणी केली. चाचडगाव, गोळशी, झार्ली, आबेगण,जालखेड या भागातील प्रामुख्याने भात, नागली, वरई, टोमॅटो, द्राक्षे या पिकांचे अतोनात नुसकान झाले. या भागातील शेतकरी अडचणीत सापडला असुन याबाबत शासकीय अधिकार्यांना माहिती देऊन पंचनामे करावे व शेतकर्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे असल्याचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले. यावेळी बाजार समितीचे संचालक नाना मोरे, जालखेडचे उपसरपंच जीवन मोरे, गोळशीचे सरपंच भाऊसाहेब चोथवे, पिटु मुळाणे, लखन मोरे, गोळशी उपसरपंच गायकवाड , समाधान मोरे, दिपक मुळाणे आदी उपस्थित होते.