दिंडोरी : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली असताना निवडणूक निकालानंतर वलखेड येथे दोन गटात वादविवाद होत हाणामारी झाली असून दोन जण जखमी झाले आहे. दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दाखल केली असून दिंडोरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.
वलखेड येथे अटीतटीची लढत होत विद्यमान सरपंच संपत शिंदे रघुनाथ पाटील यांच्या पॅनलचा विरोधी विनायक शिंदे,अनंत पाटील यांच्या पॅनलने पराभव करत सत्ता परिवर्तन केले .दरम्यान दोन्ही गटातील काही समर्थकांमध्ये वलखेड फाटा येथे वादविवाद होत हाणामारी झाली यात दोन युवक जखमी झाले असून त्यांचेवर नाशिक येथे रुग्णालयात उपचार सुरू आहे .याबाबत दोन्ही गटांतर्फे परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवले,हवालदार पगार,वाघ, गायकवाड आदी तपास करत आहे