दिंडोरी- तीन मित्र एकाच दुचाकीवरून फिरायला निघाले. फोटो काढत त्यांनी फोन वर स्टेटस टाकले. लॉंग ड्राइव्ह विथ माय ब्रद . या तीन मित्रांचा मंगळवारी पेठ रोडवर अपघात होत त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही लॉंग ड्राइव्ह अखेरची ड्राइव्ह ठरली. नाशिक-पेठ महामार्गावर उमराळे गावाजवळ कन्हैया धाब्याजवळ झालेल्या अपघातात तीन युवक जागीच ठार झाले आहेत. रात्री ११ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. स्कुटी व पिकअप समारोसमोर आदळले. त्यात स्कुटीवरील रोहित शार्दूल (रा. दिवा, मुंबई), निशांत मोहिते (रा. पंचवटी, नाशिक), अनिकेत मेहरा (रा. अवनखेड, दिंडोरी) हे युवक जागीच ठार झाले. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.