दिंडोरी – कोरोनाची दुसरी लाट आली असून त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले आहे, कोरोनाचा संसर्ग नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तो थांबविण्यासाठी जनता कर्फ्यू पाळणे गरजेचे आहे, कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नका, अति महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे,
दिंडोरी, पेठ तालुक्यात कोरोनाची परिस्थिती जरी आटोक्यात असली तरी पण गंभीर परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, सर्व ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, पोलिस पाटील, कार्यकर्ते यांनी आपल्या गावचे संरक्षक बनावे, आपल्या गावच्या संरक्षणाकरता शनिवार व रविवार उस्फूर्तपणे बंद पाळावे, सर्व व्यापारी व शेतकरी यांनी बंदमध्ये सहभागी होत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.
शंका न बाळगता लसीकरण करून घ्या
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे, त्यामुळे नागरिकांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे. ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असल्यास त्यांनी त्वरित कोरोना तपासणी करावी, पॉझिटिव्ह रुग्णांनी स्वतः व कुटुंबातील सदस्यांनी समाजातील लोकांशी संपर्क टाळावा, असे आवाहन आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले आहे,