दिंडोरी : २६ फेब्रुवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना दिंडोरी लोकसभा विस्तारक निलेश गवळी यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी नियुक्त्या केल्या, मात्र यात निष्ठावंताना डावलल्याचा आरोप युवा सैनिकांनी केला आहे. युवासैनिक नाराज झाल्याचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून सूर निघू लागला आहे असून युवासैनिकांनी या नियुक्त्यांना आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान संकर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी व ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी नाराजी दूर करण्यासाठी तातडीने बैठक घेत डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे.
नवनियुक्त पदाधिकारी यांच्या नियुक्तीने दिंडोरी लोकसभेत युवासेनेत नाराजी दिसून आली असून उघडपणे युवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही प्रकारची मुलाखती न घेता व युवासेना आणि शिवसेना यांच्या कोणत्याही पदाधिकारी यांना विश्वासात न घेता या निवडीमुळे हा असंतोष उफाळून आला.पक्ष बदल करणाऱ्या व्यक्तींना व वरच्या पदाधिकारी खाली व खालच्या पदाधिकारी वरती या बदला व नियुक्त्यांमुळे ही नाराजी दिसून आली. हे सर्व युवसैनिक जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्याकडे गेले असता त्यांनी मध्यस्थी करून शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन काही दिवसात तोडगा काढू असा शब्द देऊन नाराज युवा सैनिकांची समजुत काढली, यावेळी सहसंपर्क प्रमुख पांडुरंग गणोरे,उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर चांदवड तालुका प्रमुख विलास भवर संगम देशमुख, किरण कावळे आदित्य केळकर, सुनील जाधव संजय ढगे, संदीप जाधव, राहुल गणोरे, श्याम वाघमारे, कैलास गणोरे, आदींसह युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.