दिंडोरी : नगरपंचायत कर्मचारी किमान वेतन व फरक याबाबत कामगार उपायुक्त एस.जे शिर्के यांच्याकडे बैठक झाली. त्यात किमान वेतन प्रश्नी कॉम्रेड सीताराम ठोंबरे ,कॉम्रेड काकडे,कॉ.राजेंद्र शिंदे,कॉ.भारत कापसे , नितीन गांगुर्डे यांनी मुख्याधिकारी नागेश येवले यांच्याशी चर्चा केली.यावेळी कामगार उपायुक्त एस.जे. शिर्के यांनी किमान वेतन देण्याची सूचना मान्य केली. त्यासाठी येवले यांनी कर्मचारी वर्गवारी देण्याची मागणी कामगार उपायुक्त शिर्के यांच्याकडे केली. त्यास त्यांनी अनुमती दिली. दिंडोरी नगर पंचायत कर्मचाऱ्यांना ४ जुलै २०१५ नगरपंचायत स्थापनेपासून फरक मिळावा अशी मागणी पत्रकार नितीन गांगुर्डे यांनी केली. नगर पंचायतीकडे कोरोना पार्श्वभूमीवर आर्थिक परिस्थिती नसल्याचे मुख्याधिकारी येवले यांनी सांगितले. त्यावर शिर्के व काकडे यांनी टप्प्या टप्प्याने फरक देण्यास सांगितले. यावर सहमती झाली. यावेळी विजय केदारे,संपत शार्दूल,कमलेश गांगुर्डे,नरेंद्र पगारे यांच्यासह नगरपंचायत आस्थापना अधिकरी मावळकर, बाळासाहेब दंडगव्हाळ, अमोल मवाळ आदी उपस्थित होते. नगर ग्रामपंचायत कालीन सर्व नगरपरिषद नगरपंचायत किमान वेतन घोषणेनंतर फरकास व दरवर्षी सर्विस बुक पगार स्लिप देने आदी मागण्या मंजूर झाल्या.