दिंडोरी – दिंडोरी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबाबत हरकत घेण्याच्या मुदती अखेर तब्बल ९५० हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत . त्यात प्रामुख्याने सध्या येथे रहिवासी नसलेल्या मतदारांचे नावे कमी व्हावे तसेच ज्या प्रभागात जे मतदार राहतात त्यांचे नावे तेथेच ठेवावे आदी सूचनांचा समावेश आहे.
दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आल्या. त्याबाबत मतदारांना असलेल्या हरकती साठी देण्यात आलेल्या मुदतीत ९५० तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहेत. या सर्व तक्रारी अर्जाची पडताळणी निवडणूक आयोगातर्फे करण्यात येणार आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई करून अंतिम मतदार याद्या दिनांक १ मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहेत. अनेक मतदारांनी आपले नाव आपण राहत असलेल्या प्रभागाचा ऐवजी अन्य प्रभागात जोडण्यात आले आहेत. अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या तसेच पूर्वी शहरात राहत असलेले परंतु आता येथे राहत नसलेल्या मतदारांचे नावे हे पुन्हा सर्वेक्षण करत कमी करावे. अशा सूचना मांडण्यात आल्या असून त्याबाबत त्या तक्रारींची निवडणूक आयोगातर्फे कायदेशीर बाबी तपासत पडताळणी करण्यात येणार आहे.