दिंडोरी : नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत प्रांताधिकारी डॉ. संदिप आहेर मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या उपस्थितीत होत नऊ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहे. आरक्षणामुळे कही खुशी कही गम अशी परिस्थिती असून राजकीय नेत्यांचे राजकीय आडाखे बांधण्यास सुरवात झाली आहे. साहिल मोरे या बालकाचे हस्ते सोडत चिठ्ठी काढण्यात आली.
दिंडोरी नगरपंचायत निवडणूक २०२१ प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग क्र .१ -(कादवा नगर,वक्रतुंड नगर ) – नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला)
प्रभाग क्र २ – (शिवाजी नगर ) – सर्वसाधारण
प्रभाग क्र .३ – (शिंपी गल्ली ,बोरस्ते वस्ती ) – अनुसूचित जमाती (महिला)
प्रभाग क्र . ४ – (,चर्मकार वाडा ,आंबेडकर नगर,कोराटे रोड) – अनुसूचित जमाती
प्रभाग क्र .५ – (खालची गल्ली,रंगानाना पथ,परीट गल्ली,पांडे गल्ली ) – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र .६ – (पेठ गल्ली,धनगर वाडा, राजेश्वर गल्ली) – नागरिकांचा मागासप्रवर्ग
प्रभाग क्र .७ – (पालखेड रोड ,नवीन कळवण रोड ) – नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला) प्रभाग क्र .८ -(जवाहर नगर , विठ्ठल नगर ) – सर्वसाधारण स्त्री
प्रभाग क्र .९ – (विजयनगर ) – अनुसूचित जमाती (महिला)
प्रभाग क्र .१० – (सिद्धार्थ नगर ,गांधीनगर) – अनुसूचित जाती
प्रभाग क्र .११ -( लुंबिनी नगर ,निर्मला विहार ,नवीन नाशिक कळवण रोड ) – नागरिकांचा मागासप्रवर्ग
प्रभाग क्र .१२ -(भवानी नगर ,नवीन जुना कळवण रोड,तकवा) अनुसूचित जमाती
प्रभाग क्र .१३ – (मोठा वाडा ,रथगल्ली,गट्टी ,कर्पे गल्ली ) सर्वसाधारण स्त्री
प्रभाग क्र .१४ – (भवानी नगर) सर्वसाधारण
प्रभाग क्र .१५ – (इंदिरा नगर ,भवानी नगर) अनुसूचित जाती महिला
प्रभाग क्र .१६ – (इंदिरा नगर ) नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला) प्रभाग क्र .१७ – (कोळीवाडा ,पाडेकर नगर ,उमराळे चौफुली) – सर्वसाधारण