दिंडोरी – तालूक्यात कृषी पंपासाठी थ्री-फेज वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा प्रहारच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष तालूका प्रमुख सुकदेव खुर्दळ यांच्या शिष्टमंडळाने, उपविभागीय वीज वितरण मंडळाचे अभियंता राऊत यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
दिंडोरी तालूक्यात सद्यस्थितीला गहू हरभरा आदी पीकांना पाणी देण्याची शेतकरी धावपळ करत आहे. शेतक-यांना कृषी पंपासाठी नियमा प्रमाणे, सुमारे आठ तास थ्री- फेज विद्युत पुरवठा केला जात असतानाही, सलगपणे विद्युत पुरवठा होत नाही. सतत पुरवठा खंडीत होत आहे.यामुळे पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे.व खंडीत वीज पुरवठा मुळे विद्युत पंप नादुरूस्त होणे, आदी प्रकार घडत आहेत.
आठ तासात पैकी केवळ चार पाच तासच वीज मिळत आहे.याबाबत तात्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा येत्या आठ दिवसात राज्य मंञी ना बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशान्वये प्रहार स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी प्रहारचे तालूका प्रमुख सुकदेव खुर्दळ ,उपतालूका प्रमुख गिरिश शिरसाठ, बाळासाहेब अस्वले, तालूका सरचिटणीस संदिप केंदळे, युवा तालूका प्रमुख विक्रम बोराडे, रोहित पाटील,घोडेस्वार आदी सह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.