जोपुळला होमिओपॅथी औषध वाटप
दिंडोरी – भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन युवक आघाडी व क्रांतीपर्व मित्र मंडळ यांच्या मार्फत रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथी औषधांचे वाटप करण्यात आले. आयुष्य मंत्रालयाने प्रमाणित केलेल्या आर्सेनिक अल्बम ३० चे मोफत वाटप डॉ योगेश गांगुर्डे व डॉ अजय तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या प्रसंगी तालुका अध्यक्ष जयेश गांगुर्डे, मार्गदर्शक मंगेश गांगुर्डे, अमोल कदम, शशी अहिरे, उपसरपंच माधव उगले, प्रवीण अहिरे, संदीप गांगुर्डे, प्रेम गांगुर्डे, सुमित अहिरे, प्रशांत गांगुर्डे, ऋषी गांगुर्डे, धीरज गांगुर्डे, श्रीकांत अहिरे, रोहित गांगुर्डे, प्रज्वल अहिरे, युक्रांत गांगुर्डे, गौरव अहिरे, दत्तू अहिरे, प्रतीक अहिरे, हर्षल गांगुर्डे, बापू अहिरे, यतिष गांगुर्डे, मनोज अहिरे, क्रांतीपर्व मित्र मंडळाचे व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
—
रक्तदान शिबिराचे आयोजन
दिंडोरी तालुका भारतीय बौद्ध महासभा व समता रक्तपेढी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड वसतिगृह येथे स्वातंत्र्य दिन आणि महाकवी वामन दादा कर्डक यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन महासभेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गांगुर्डे, सरचिटणीस रितेश गांगुर्डे व समता रक्तपेढीचे डॉ. इरफान खान , कुटुंब फाऊंडेशन नाशिकच्या सुचित्रा आहिरे यांनी भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने केले. रक्तदान शिबिरात युवकांनी सहभाग नोंदवला. यावेळी कोषाध्यक्ष चंद्रकांत पगारे, पर्यटन सचिव प्रदीप गांगुर्डे, संस्कार सचिव जयेश मोरे, संकेत साळवे, किशोर काळू सोनवणे, हिरामण गायकवाड, घनश्याम शिंदें, शरद गांगुर्डे,अमोल पगारे, देवसिंग खरे, बाळासाहेब शेजवळ, चेतन गांगुर्डे, नितीन निकम,निखिल शिरसाठ,संकेत निकम, योगेश एलिंजे,रोहन लोखंडे,महेंद्र निकम,राकेश साळवे, कुणाल साळवे,गणेश गांगुर्डे, विकास गांगुर्डे, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.
—
खतवडला दिव्यांग व्यक्तीला दिला सन्मान
खतवड येथे स्वातंत्र्य दिना निमित्ताने शासकीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुकदेव खुर्दळ या दिव्यांग व्यक्तीस ध्वजारोहणा
चा मान देण्यात आला. सुकदेव हे प्रहार जनशक्त चे तालुका प्रमुख आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करत स्वांतत्र्यं दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सदस्य राहूल गवे यांच्या हस्ते करण्यात आले. परनार्ड रिकाॅर्ड कंपनीच्या वतीने गुणवंत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व भेट वस्तू प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या. सरपंच संगिता माळेकर, उपसरपंच मुळाणे, पोलिस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष सोमनाथ मुळाणे, ग्रामसेविका काथेपुरी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब खुर्दळ, महात्मा गांधी तंटा मुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, मुख्याध्यापिका जाधव, ग्रामपंचायत सदस्य विनोद जाधव, प्रकाश जाधव,पुंजा मुळाणे आदी शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—
भनवडला आशा वर्करच्या हस्ते ध्वजारोहण
कर्मवीर रा स वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था राजारामनगर संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, भनवड येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त आशा वर्कर मिराबाई बागुल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाचेपूजन मुख्याध्यापक गुलाबराव भुसाळ यांनी केले. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी , जेष्ठ नागरिक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कस, आदिवासी सोसायटी चेअरमन व सदस्य, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक व शिक्षक, वनविभाग कर्मचारी, आश्रमशाळा प्राथमिक, माध्यमिक मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक बी पी जाधव यांनी सूत्रसंचालन करून मुख्याध्यापकानी मान्यवरांचे स्वागत केले.
—
प्रा. डॉ. घनश्याम जाधव दिंडोरी भूषण पुरस्काराने सन्मानित
दिंडोरी येथील भूमीपुत्र, प्रगतशील शेतकरी कुटुंबातील मविप्र औषधनिर्माण शास्त्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव यांना दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीने यंदाच्या दिंडोरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रा.डॉ जाधव यांना माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात
आला. प्र. नगराध्यक्ष कैलास मवाळ, मुख्याधिकारी नागेश येवले, सर्व नगरसेवक, कर्मचारी, कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव, दत्तात्रेय जाधव, भाऊसाहेब बोरस्ते, युवा नेते अविनाश जाधव, डॉ.विजय पाटील , रमेश मावळ, अनिल चौघुले, रणजित देशमुख, भगवान गायकवाड, विजूनाना पाटील माजी सरपंच, भगवान जाधव ,जयवंत जाधव, मनोज ढिकले , डॉ. संदीप गोसावी, किशोर ठोके, अशोक निकम, गुलाब गांगुर्डे ,नितीन देशमुख, निलेश गायकवाड, अप्पा देशमुख, दीपक ढुमणे आदींसह नागरिक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.