दिंडोरी – तालुक्यात बेमोसमी पावसामुळे द्राक्ष बागांचे लाखोंचे नुकसान झाले असून द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहे. तालुक्यातील पाडे येथील शेतकरी सुरेश काशीनाथ नाठे यांच्या २ एकर बागेचे अवकाळी पावसाने १० ते १२ लाख रुपये नुकसान झाले. नळवाडी दिंडोरी पालखेड वलखेड ओझे लोखंडेवाडी जोपुळ मातेरेवाडी खेडगाव,जवळके राजापूर बोपेगाव मोहाडी सह सर्वच गावात परिपकव होत चाललेल्या द्राक्ष मन्यांना तडे जात मोठे नुकसान झाले. तसेच भाजीपाल्याचे ही नुकसान झाले आहे.नुकसणीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.