दिंडोरी – दिंडोरी तालुक्यात मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अवेळी पावसाने वादळवाऱ्यासह हजेरी लावत द्राक्ष, कांदा पिकासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त असे की दिंडोरी तालुक्यात बेमोसमी पावसाने दिंडोरी,मोहाडी, खडक सुकेने, वलखेड, वनी, पांडाणे, पुणेगाव आदी परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नुकत्याच छाटलेल्या द्राक्ष बागेचे नुकसान झाले, तसेच काढणीला आलेला कांदा पिकाचे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. अवेळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली, दिंडोरी शहरातील पालखेड रोडला पावसामुळे पाणी साचले होते, सुमारे १५ मिनिटे पाऊस सुरू होता.