दिंडोरी : तालुक्यात कोरोनाचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत असून गेल्या गेल्या आठ दिवसात २५० रुग्ण करोना बाधित आढळले असून प्रशासनाने सतर्क होत उपाययोजना सुरू केल्या आहे. तहसिलदार पंकज पवार यांनी दिंडोरी,वणी खेडगाव सह अनेक गावांना भेटी देऊन नियम न पाळणारे व्यावसायिक व नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
दिंडोरी शहरात सुध्दा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिंडोरी शहरातील प्रत्येक प्रभागात कोरोनाचे रुग्ण थोड्याफार काळाने वाढत चालले आहे. सध्या नाशिकचे सर्व कोविड रुग्णालय पुर्ण भरले असल्याने अनेक रुण होम क्कारंटाईन होत आहे. काही दिवसांपुर्वी दिंडोरीत अपघात झालेल्या एका रुग्णाला नाशिकच्या ग्रामीण रुग्णालयात सुध्दा दाखल करुन घेतलेले नव्हते. दिंडोरी तालूक्यात सध्या अनेक नोकरदार नाशिक येथून ये जा करतात. त्यामुळे त्यांच्यापासुन करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो अशी शक्यता आहे.या सर्व नोकरदारांवर अंकुश ठेवणे गरजेचे झाले आहे.खेडोपाडी तहसिलदार पंकज पवार यांनी भेटी देऊन करोना नियंमाचे पालन करण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले आहे.
दिंडोरी शहरातील व्यवसाय ठप्प व्यापारी अडचणीत
गेल्या वर्षीच्या लॉक डाऊन नंतर मोठ्या अडचणीत आलेला व्यवसाय कुठे पुन्हा रुळावर येत असताना कोरोनाचा प्रार्दुभाव वाढल्याने बाजारपेठेवर सात नंतर व शनिवार रविवार निर्बंध आल्याने छोटे मोठे व्यापारी अडचणीत सापडले आहे शहरातील भाजी बाजार शहराबाहेर गेल्याने ग्राहक संख्या घटल्याने व्यापारी त्रस्त झाले आहे शासनाने वीज बिल ,जिएस्टी ,भाडे ,मालमत्ता कर यात सूट द्यावी अशी मागणी व्यावसायिक करत आहे.भाडेतत्त्वावर दुकान घेऊन व्यवसाय करणाऱ्या काही व्यावसायिकांनी व्यवसायाला रामराम ठोकत दुसरा पर्याय निवडण्याची तयारी केली आहे शहरातील भाजी बाजार जुन्या ठिकाणी पटांगणात सुरू करावा अशी मागणी व्यवसायिकांनी केलीं आहे.