दिंडोरी : तालुक्यात ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ८७.२३ टक्के मतदान शांततेत व मोठ्या उत्साहात पार पडले आहे. तहसीलदार पंकज पवार यांचे मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणेने नियोजन करत मतदान प्रक्रिया पार पडली सर्व ठिकाणी चुरशीच्या लढती दिसून आले. ३१२८८स्त्री व ३५७१६ असे एकूण ६७००४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ८२२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून सोमवार १८ रोजी मतमोजणी होणार आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळी साडे सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. तालुक्यातील सर्वच गावांमध्ये मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याने त्याच्या सावटाखाली मतदान होत असल्याने प्रशासनाने आरोग्य विभागा सह प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर येणाऱ्या प्रत्येक मतदाराचे तापमान चेक करण्यासाठी आरोग्य यंत्रणेची कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीसाठी होत असलेल्या या निवडणुकीत सर्वच गावात मोठ्या प्रमाणात चुरस असल्याने मतदानाची आकडेवारी दुपारी तीन वाजेपर्यंतच इतकी होती मतदान सुरू झाल्यानंतर आणि केंद्र मधील मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे दिसून आले. तालुक्यातील खडक सुकेना कुर्नोली येथील मतदार यंत्रात बिघाड झाल्याने मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु प्रशासनाने नवीन मतदान यंत्र सुरू करू मतदान पूर्ण केले. तालुक्यातील मोठ्या गावांसह छोट्या गावांमध्येही मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला ग्रामपंचायतचे मतदान म्हणजे ग्रामीण भागातील लोकशाहीचा उत्सव तालुक्यातील लखमापुर चिंचखेड जोपुळ मातेरेवाडी बोपेगाव कोशिंबे अहिवंतवाडी पाडाणे खडकसुकेने आंबेदिंडोरी पालखेड,पिंपळगाव केतकी, कुर्नोली परमोरी इंदोरे हातनोरे तिसगाव सोनजांब परमोरी येथील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले काही ठिकाणी बोगस मतदानाच्या देखील तक्रारी झाल्याचे दिसून आले. परंतु ,प्रशासनाने योग्य भूमिका घेतल्याने वाद मिटला मतदान केंद्राच्या उमेदवारांच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले अनेक ठिकाणी मतदारांची वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनांचा वापर करण्यात आला निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता गावांमध्ये सायंकाळपर्यंत मतदारांची गर्दी दिसून आली अनेक वार्डात चार वाजेपर्यंत सरासरी ९० टक्केच्या वर मतदान झाले होते सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांची गर्दी असल्याने अंतिम आकडेवारी हाती येऊ शकली नाही.
काही गावांमध्ये झालेली मतदान टक्केवारी
कोल्हेर – 89%
जोपुळ – 87.48
चिंचखेड- 86.15
लखमापूर – 86.46
आंबे दिंडोरी – 89.33
सोनजांब -92
करंजाळी -94.26
अंबाड -86
वलखेड 91.11
मावडी -86.91
इंदोरे -90.20
मातेरेवाडी -92
खडक सुकेने -94.37
वाघाड -85.88
बोपेगाव -88.57
म्हेळूस्के -90.65