दिंडोरी – केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी, यांना कोविड ची लस देण्यात आली.त्यानंतर ४५ ते ६० वयोगटातील बी पी शुगर, असणाऱ्या नागरिक व ६० वर्ष वयोगतील सर्व नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली असून दिंडोरी तालुक्यात तळेगांव दिंडोरी, मोहाडी, उमराळे, कोचरगाव व पांडाणे या ठिकाणी कोविशिल्डची लस देण्यात येत आहे. याच पाच केंद्राबरोबरच अजून खेडगाव व नानाशी प्राथमिक केंद्रात पुढील आठवड्यात लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुजित कोशिरे यांनी दिली. आतापर्यंत अशी लस देण्यात आली.
१) आरोग्य आणी एकात्मिक बाल विकास प्रकल्प मधील अधिकारी व कर्मचारी- १४९०
२) ग्रामपंचायत, महसूल व इतर फ्रन्ट लाईन वर्कर- ९८६
३) ४५ ते ५९ मधील comorbid- ९१५
४) ६० पेक्षा जास्त वयोगटातील – १४६५
अशा एकूण ४८५६ नागरिकांना लस देण्यात आली असून लसीकरण केंद्र वाढविल्यामुळे आपल्या परिसरातच नागरिकांना लस उपलब्ध होणार आहे. उपकेंद्रांवर ही लस केंद्र सुरू करण्याचे नियोजन दिंडोरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लस सुरू असून या आरोग्य केंद्रांतर्गत येणारी मोठी उपकेंद्र आहेत त्याठिकाणी मोठी इमारत, वेटिंग रुम, निरीक्षण कक्ष उपलब्ध आहे असा उपकेंद्रवर येत्या १ एप्रिल पासून लस केंद्र सुरू करण्याचे नियोजन असल्याचे डॉ सुजित कोशिरे यांनी सांगितले. तालुक्यातील पात्र नागरिकांनी आपल्या परिसरातील सुरू असलेल्या केंद्रांवरच गर्दी न करता उपस्थित राहून आधार कार्ड सोबत ठेवून लस घ्यावी असे आव्हाहन डॉ. सुजित कोशिरे यांनी केले आहे.