दिंडोरी : तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी स्त्री आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी डॉ संदीप आहेर यांचे अध्यक्षतेखाली तर तहसीलदार पंकज पवार यांचे उपस्थितीत काढण्यात आली त्यात तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी राखीव झाले आहे.अनुसूचित क्षेत्रातील ५२ ग्रामपंचायतीत जेथे सध्या अनुसूचित जमाती महिला राखीव होते ते आता अनुसूचित जमाती सर्वसाधारण झाले आहे. तर जेथे अनुसूचित जमाती सर्वसाधारण होते तेथे महिला राखीव झाले आहे.अनुसूचित क्षेत्राबाहेरील अवनखेड अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला साठी राखीव झाले तर मातेरेवाडी अनुसूचित जमाती सर्वसाधारण झाले आहे.नागरिकांचे मागास प्रवर्ग पाच पैकी तीन महिला राखीव तर दहा सर्वसाधारण ठिकाणी पाच महिलांसाठी राखीव झाले.आरक्षण जाहीर होताच सरपंच पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
दिंडोरी तालुक्यातील २०२० ते २०२५ साठी गाव निहाय आरक्षण
अनुसूचित क्षेत्रातील १०४ ग्रामपंचायत
अनुसूचित जमाती स्त्री
ननाशी,कादवा म्हाळुंगी,अंबानेर,खेडले, देवपाडा, मोखनळ, वरवंडी, कोचरगांव, तळेगांव दिं., दहेगांव, फोफशी, भातोडे, मोहाडी, रासेगांव, धाऊर, अक्राळे, कृष्णगांव, कोराटे, देवठाण, तळयाचापाडा, पळसविहीर, मडकीजांब, मुळाणे, माळेगांव काझी, देहरे,पिंपरखेड, धागुर, नळवाडी, ढकांबे, चारोसे, जांबुटके, कवडासर, देवघर, जालखेड, निळवंडी, गोडेगांव, चिचखेड, जोपुळ, पालखेड बं., वणी खु., आंबाड,इंदोरे, चाचडगांव, चोसाळे, वारे, कुर्णाली, पिंप्री आंचला, चंडीकापुर, महाजे, फोपळवाडे, तिल्लोळी, धोडाळपाडा
अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)
वनारवाडी, ओझे, हातनोरे, आंबेगण ,करंजवण, जानोरी,निगडोळ, उमराळे खु., जऊळके दि., देवपुर, राजापुर, वरखेडा
शिवनई, टिटवे, कसवेवणी, पिंपळनारे, खतवड, नळवाडपाडा, झाली, शिवारपाडा, कोकणगांव खु., आशेवाडी, उमराळे बु., गवळवाडी,रवळगांव, अहिवंतवाडी, कोशिबे, खडकसुकेणे, गोळशी, देवसाने, करंजखेड, हस्तेदुमाला, गांडोळे, पांडाणे, वाघाड, कोकणगांव बु. कोल्हेर,जोरण,पुणेगांव, बाडगीचापाडा, भनवड, माळेदुमाला
वनारे, विळवंडी,|पिंपळगांव के., आंबे दि., नाळेगांव, दहिवी, मावडी, पिंपळगांव धुम, करंजाळी
सावरपाडा/रडतोंडी
अनुसूचित क्षेत्राबाहेरील १७ गावे
अवनखेड : अनुसूचित जाती ( स्त्री राखीव )
मातेरेवाडी :अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)
म्हेळूस्के : नागरिकांचा मागास प्रवर्ग ( स्त्री राखीव )
शिंदवड : नागरिकांचा मागास प्रवर्ग ( स्त्री राखीव )
ओझरखेड : नागरिकांचा मागास प्रवर्ग ( स्त्री राखीव )
सोनजांब : नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)
परमोरी : नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)
सर्वसाधारण
लोखंडेवाडी (सर्वसाधारण स्त्री राखीव )
लखमापूर (सर्वसाधारण स्त्री राखीव )
तळेगाव वणी (सर्वसाधारण स्त्री राखीव )
आंबेवणी (सर्वसाधारण स्त्री राखीव )
पाडे ( सर्वसाधारण,स्त्री राखीव )
खेडगाव (सर्वसाधारण)
बोपेगाव (सर्वसाधारण)
वलखेड (सर्वसाधारण)
जवळके वणी (सर्वसाधारण)
तिसगाव (सर्वसाधारण)