दिंडोरी – तालुक्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील सतरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण १४ डिसेंबर रोजी दिंडोरी येथे पंचायत समिती सभागृहात होणार असल्याची माहिती तहसीलदार पंकज पवार यांनी दिली.
दिंडोरी तालुक्यात एकूण १२१ ग्रामपंचयातीपैकी १०४ ग्रामपंचयात या अनुसूचित जमाती सरपंच पदासाठी राखीव असून उर्वरित १७ अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीच्या आरक्षणाची सोडत १४ डिसेंबर रोजी दिंडोरी येथील पंचायत समिती कार्यालयात होणार आहे. तळेगाव वणी, आंबे वणी, चिंचखेड, म्हेळुसके, वलखेड,अवनखेड ,तिसगाव , लोखंडेवाडी, खेडगाव, पाडे, जऊळके वणी,बोपेगाव, परमोरी सोनजांब , मातेरेवाडी, ओझरखेड, लखमापूर, या १७ ग्रामपंचयात पैकी ४ जागा अनुसूचित जाती( एस सी), ४ जागा अनुसूचित जमाती(एस टी), ५ जागा (इतर मागास वर्ग (ओबीसी) आणि ४ जागा सर्वसाधारण साठी आरक्षित असणार आहे.
मुदत संपत आल्याने मार्च २०२० मध्ये सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले होते. परंतु करोना विषाणू पार्श्वभूमीमुळे निवडणूक आयोगाने सोडतीचा कार्यक्रम स्थगित केला होता. पण नुकताच ग्रामविकास खात्याने नाशिक जिल्हाधिकारी यांना आरक्षण निश्चितीबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. सदर निर्देशानुसार दिंडोरी तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत होणार असून कोणत्या गावात कोणते आरक्षण निघते याकडे संबंधित गावांचे लक्ष लागले आहे.