दिंडोरी: तालुक्यातील माळे दुमाला येथे एकच रात्री पाच गाईंचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. खंडेराव व डॉ. कौठळे यांनी घटनास्थळी भेट देत सदर गाईंचे शवविच्छेदन केले असून त्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे .
दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथे सोमवारी रात्री रोजी अचानक रात्री पाच गाईचा मृत्यू झाला असून पशुधन पाळणारे शेतकरी धास्तावले आहे. पशु वैदयकिय अधिकारी यांनी गुरांना लसीकरण करण्याची मागणी होत आहे. धोंडीराम संपत गायकवाड, मंगेश नामदेव गायकवाड, लहाणू संपत गायकवाड, बाळू भास्कर डगळे या तीन अदिवाशी शेतमजुरांच्या गाई अचानक रात्री मेल्या.त्या गाईच्या तोंडातून फेस व नंतर जमीनीवर चक्कर येवून पडून त्यांचा मृत्य होत होता असे ग्रामस्थांनी सांगितले. सदर घटनेची माहिती जिल्हा परिषद सदस्य रोहीणी गावित ,शिवसेना नेते सदाशिव गावित, पंचायत समीतीचे सदस्य उत्तम जाधव यांनी तात्काळ शासकीय अधिकारी यांना भ्रमणध्वनी वर संपर्क साधून दिली. यावेळी त्यांनी सदर पशुधन कशामुळे मृत झाले. याचे शवविच्छेदन करून आदिवाशी पशुधन नागरीकांना नुकसान भरपाई दयावी अशी मागणी जिल्हा परिषेदेत करणार असल्याचे सांगितले. सदर गाईचा मृत्यू कशामुळे झाला यासंदर्भात पशुधन अधिकारी यांना विचारले असता गाईना विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज डॉ साबळे यांनी सांगीतले. तसेच आता गाईचे शवविच्छेदनचा अहवाल आल्यानंतर गाईच्यामृत्यूचे कारण समजेल असे डॉ. कैलास साबळे यांनी सांगितले .तसेच दोन दिवसा पुर्वी १० शेळ्याचाही मृत्यू झाला होता असे जर्नादन घुगे यांनी सांगीतले. तसेच शासनाने गाईच्या बदल्यात गाय देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे