दिंडोरी : तालुक्यातील जवळके वणी येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील गटाने एकत्र येत निवडणूक बिनविरोध करत नवीन आदर्श निर्माण केला आहे. जवळके वणी येथे शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात चुरशीच्या निवडणूक होत होत्या. मात्र या वर्षी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध केली आहे.
नऊ जागेवर बिनविरोध निवड झालेले सदस्य पुढीलप्रमाणे
वार्ड क्र.१ -योगेश पांडुरंग दवंगे ,ज्योती किरण बोंबले,मनीषा अशोक दवंगे
वार्ड क्र. २ – मंगला बाळासाहेब गांगुर्डे,मोनिका दिलीप बोंबले,उज्वला शंकर दवंगे
वॉर्ड क्र ३ – विशाल अशोक बकरे,ज्ञानेश्वर लक्ष्मण दवंगे,स्वाती सतीश पाटील