दिंडोरी : तालुक्यात अग्रगण्य असलेल्या व विविध पुरस्कार प्राप्त खेडगाव ग्रामपालिकेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खेडगाव करांनी विकासासाठी एकत्र येत निवडणूक बिनविरोध करत आदर्श निर्माण केला आहे. लोकमत सरपंच ऑफ द इअर पुरस्कार मिळविणारे विद्यमान उपसरपंच तथा बाजार समिती सभापती,मविप्र संचालक दत्तात्रेय पाटील यांची गेल्या ४२ वर्षांपासूनची सत्ता कायम राहिली आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानसह विविध विकास पुरस्कार खेडगाव ग्रामपालिकेस मिळालेले आहे. सतरा जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीराम शेटे,दत्तात्रेय पाटील व शिवसेनेचे नेते सुरेश डोखळे ,जयराम पाटील यांच्या गटात चुरशीची होण्याची चिन्हे होती. मात्र विकासाच्या मुद्द्यावर दोन्ही गटांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध केली.
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नानरहरी झिरवळ यांनी दिंडोरी तालुकयात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूका अतिशय कठीण प्रसंगात म्हणजे कोरोनाचा कहर आणि निसर्गाचा लहरीपणा यात निवडणुका मध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो.जास्त प्रमाणत गट तट पडत असल्याने गावाच्या विकासात मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे झिरवाळ यांनी ज्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होतील त्या ग्रामपंचायतला ग्रामविकास करण्यासाठी मोठा निधी जाहीर केला होता. झिरवळ यांच्या आवाहनाला खेडगाव ग्रामस्थांनी प्रतिसाद देत २०२१ ते २०२६ साठी खेडगाव ग्रामपंचायत बिनविरोध केली.
बिनविरोध निवडीमध्ये खालील उमेदवार याची वर्णी लागली आहे
वार्ड क्रमांक १– गांगुर्डे सोनाली राजेंद्र,सोमनाथ धोंडीराम धुळे
वार्ड क्रमांक २ – दत्ताञेय रामचंद्र पाटील, निशा रविंद्र डोखळे, सविता संजय वाघ
वार्ड क्रमांक ३ – प्रशांत बाळासाहेब पाटील, सुजाता सुरेश सोनवणे, कुसुम जगन्नाथ सोनवणे
वार्ड क्रमांक ४ – पुजा शिवलाल खराटे, राजेंद्र परसराम ढोकरे, रमेश भास्कर गांगुर्डे
वार्ड क्रमांक ५ – अनिल प्रभाकर ठुबे,जयश्री भाऊसाहेब सोनवणे, शैलेश अशोक शेटे
वार्ड क्रमांक ६ – सुनिल धोंडु वाघ, छाया रमेश जगताप, मिरा दामु वाघ
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी यांचे प्रयत्न यशस्वी
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कादवा कारखाना चेअरमन श्रीराम शेटे, दत्तात्रेय पाटील, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील,शिवसेना नेते सुरेश डोखळे , शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील,जिप सदस्य भास्कर भगरे, माणिकराव पाटील,जयराम डोखळे, राजुशेठ सोनवणे बाळासाहेब उगले, शरदआण्णा ढोकरे अनिलदादा ठुबे, पोपट महाले, भिकाजी उगले, सतीश गांगुर्डे ,परशराम भोई, अशोक वाघ आदींनी परिश्रम घेतले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी गावच्या विकासाठी माघार घेणारे उमेदवार व ग्रामस्थांचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अभिनंदन केले आहे.